State News

Where Modi Govt. is failed ! Report Card by BJP MP

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सतत मोदी सरकारला (Modi Govt) घरचा आहेर देत असतात. ट्विटरवरून ते नेहमीच मोदी सरकारच्या कामांवर टीका करत असतात. आता त्यांनी मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड ट्विट करत सगळ्या आघाड्यांवर सरकार नापास झाल्याचं म्हटलं आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा, सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण इत्यादी मुद्द्यांवर सरकार पास होऊ शकलं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या सगळ्यासाठी सुब्रमण्यम स्वामी जबाबदार आहे अशा शब्दात उपरोधिक टोलाही लगावला आहे.सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला याआधीही अनेकदा सवाल केले आहेत. यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टीकाही केली जाते. गुरुवारी सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड ट्विट करत त्यात अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा, परराष्ट्र निती, राष्ट्रीय सुरक्षा, अतंर्गत सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर सरकार नापास झाल्याचं म्हटलं आहे.अर्थव्यवस्थेत नापास, सीमा सुरक्षेत नापास, परराष्ट्र धोरणात अफगाणिस्तानमध्ये अपयश मिळालं. राष्ट्रीय सुरक्षेवरून पेगॅसस प्रकरण, अंतर्गत सुरक्षेत काश्मीरमध्ये निराशेचं वातावरण असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसंच या सगळ्यासाठी जबाबदार कोण ? सुब्रमण्यम स्वामी असं ट्विट स्वामींनी केलं आहे .याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यावरूनही उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर त्यांना तृणमूलमध्ये प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी प्रत्येकवेळी सोबत आहे असं म्हणतं उत्तर देणं टाळलं.स्वामींनी ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर ट्विटरवर म्हटलं की, मी जितक्या राजकीय नेत्यांना भेटलो किंवा ज्यांच्यासोबत काम केलं. त्यामध्ये ममता बॅनर्जी, जेपी, मोराररजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर, पीव्ही नरसिंह राव यांचा समावेश आहे. या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नव्हता. भारतीय राजकारणातील हा दुर्मीळ गुण असल्याचंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते.

Comment here