Sports

अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ, सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर.

ढाका : क्रिकेटच्या मैदानात चुरस, स्पर्धा हे सर्व दिसतच असतं. मात्र एखादा खेळाडू रागाच्या भरात स्टंपला लाथ मारतो किंवा स्टंप काढून फेकून देतो, असे सहसा होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
खेळाडूंकडून असे कृत्य तर कोणी अपेक्षित ही करत नाही. मात्र बांग्लादेशचा माजी कर्णधार अष्टपैलू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) असेच कृत्य बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लीगमध्ये (Dhaka Premier League) केले आहे. अंपायरने दिलेल्या निर्णयामुळे खुश नसलेल्या शाकिबने थेट स्टंपलाच लाथ मारली. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा पंचाशी वाद झाल्यानंतर थेट स्टंप जमिनीतून
काढून फेकून दिले. (Bangladesh Cricketer Shakib Al Hasan Gets Angery on Umpire Decision And Kicks Stumps In Live Match At Dhaka Premier League 6)

बांग्लादेश येथे सुरु असलेल्या ढाका प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी 11 जूनला मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि अबाहनी लिमिटेड (Mohammedan Sporting vs Abahani Limited) या दोन संघात सामना होता. सुरुवातीपासूनच हलक्या पावसांच्या सरीमुळे सामन्यात व्यत्यय येईल असे वाटत होते. पण व्यत्यय पावसामुळे नाही तर, दुसऱ्याच गोष्टीने आला. मोहम्मडन संघाचा कर्णधार शाकिबला राग अनावर झाल्याने त्याने चालू मॅचमध्ये स्टंपला लाथ मारली तर दुसऱ्या वेळेस स्टंप उखाडून फेकून दिले.
अंपायरचा निर्णय अमान्य
सर्वात आधी पाचव्या ओव्हरमध्ये शाकिबने शेवटच्या बॉलवर एलबीड्ब्लूची अपील केली. त्यावर अंपायरने फलंदाजाला नॉटआउट करार दिलं. ज्यामुळे शाकिबला राग अनावर झाला आणि त्याने अंपायर समोर जात स्टंपवर लाथ मारली आणि अंपायरशी वाद घालू लागला. हा किस्सा घडतो न घडतो तोच लगेच नंतरच्या ओव्हरला पाऊस आल्याने अंपायरने खेळ थांबवण्याचा इशार दिला. ज्यामुळे पुन्हा शाकिब भडकला आणि त्याने अंपायर जवळ जात तिन्ही स्टंप जमिनीतून काढून फेकून दिले. त्यानंतर एक स्टंप पुन्हा जमिनीत रोवला. ढाका प्रिमियर लीगचे सामने यूट्यूब आणि फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम होत असल्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच शाकिबवर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे.

Comment here