City News

15 Lakshadweep BJP leaders and workers resigned over sedition FIR against filmmaker Aisha Sultana

लक्षद्वीप- फिल्ममेकर आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. लक्षद्वीपच्या 15 भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आयशा सुल्ताना विरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांच्या तक्रारीनंतर राजद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (15 Lakshadweep BJP leaders and workers resigned over sedition FIR against filmmaker Aisha Sultana)

भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद यांनी सांगितलं की, आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्हाला यावर आक्षेप आहे आणि आम्ही आमचा राजीनामा देत आहोत. लक्षद्वीपची पहिली महिला फिल्ममेकर आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान त्यांनी लक्षद्पीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या यावरुन टीका केली होती.

पार्टीच्या 12 नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र अब्दुल खादर हाजी यांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रात म्हणण्यात आलंय की, ‘भाजपला हे माहितीये की प्रशासक प्रफुल पटेल यांचे निर्णय जनविरोधी, लोकशाही विरोधी आहेत. लोक यामुळे त्रासले आहेत.’ राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप राज्य सचिव अब्दुल हामिद मुल्लीपुरा, वक्फ बोर्डाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. नेत्यांनी आयशा सुल्तानचे समर्थन करताना म्हटलंय की, ‘इतरांप्रमाणे आयशानेही माध्यमांवर आपली मतं व्यक्त केली आहेत. पोलिसांनी अब्दुल खादर हाजी यांच्या तक्रारीच्या आधारावर आयशा सुल्ताना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांचे कुटुंब आणि भविष्य उद्धवस्त झालं आहे.’ अब्दुल खादर यांनी आयशा सुल्तानावर आरोप लावला होता की, त्यांनी मल्याळम चॅनलवर सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान कोरोना विषाणूप्रकरणी खोटी माहिती पसरवली आहे.

Comment here