City News

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजपा अक्रामक, अक्रोश आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Aurangabad. 3 June.  ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजपाने अक्रामक भूमिका घेत आज राज्यभर अक्रोश आंदोलन करत ठाकरे सरकारचा निषेध केला.  क्रांतीचौकात आज सकाळी शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. हातात पोस्टर घेवून महाआघाडी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. निर्वासित निवडणूक निरस्त करुन ओबीसी संपवायचा राजकीय डाव, आयोग निर्मिती बाबत शासन निष्क्रीय का राहीले, राज्य शासनाची खेळी ओबीसी आरक्षणाचा बळी, मराठा, ओबीसी दोन्ही आरक्षणाकडे आघाडी शासनाचा कानाडोळा असे पोस्टर हातात झळकावत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आमदार अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले महाआघाडी सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात दिरंगाई केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार ओबीसी दुर्बल घटकातील कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून येवून सेवा करण्याची संधी मिळत होती. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले होते पण या आघाडी सरकारला ते पण टिकवता आले नाही. तसेच ओबीसी आरक्षण या सरकारने घालवले यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षण बहाल झाले नाही तर भाजपा आणखी अक्रामक आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. क्रांतीचौक पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यावेळी झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बापू घडामोडे, राजेश मेहता, अनिल मकरिये, गोविंद केंद्रे, मनिषा भन्साळी, मनिषा मुंडे, गीता कापूरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comment here