City News

पैठणच्या यात्रा मैदानावरील ४४ अनधिकृत गाळे पाडले

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील यात्रा मैदानावरील अनधिकृत बांधण्यात आलेले ४४ गाळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (IAS Sunil Chavan) यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी (ता. २६) जमीनदोस्त करण्यात आले. तत्पूर्वी या गाळ्यात अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना २४ तासांच्या (Paithan) आत गाळे रिकामे करण्याची नोटीस दिली होती. यानंतर जेसीबी, पोकलेन मशिनरीच्या साहाय्याने गाळे पाडण्याची धडक कारवाई करण्यात आली. यावेळी चोख (Aurangabad) पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. गुरुवारी सकाळी अतिक्रमण केलेल्या गाळ्यांची तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्याधिकारी संतोष आगळे, सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी पाहणी केली. यानंतर प्रत्यक्ष गाळ्यांचे बांधकाम पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. सदरील गाळ्यांचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या जागेवर नगर परिषदेने नियमबाह्य केली असल्याची जनहित उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन २०१७ मध्ये न्यायालयाने अतिक्रमण बांधकाम पाडण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी. असे याचिका निकालात स्पष्ट केले होते. परंतु यानंतर ही गाळ्यांचे बांधकाम पाडण्यात न आल्याने याचिकाकर्ता यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता या तक्रारीची गंभीर दखल घेऊन नगर परिषद मुख्याधिकारी यांना तातडीने गाळे बांधकाम पाडण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार ४४ गाळे पाडण्यात आले आहे.

गाळे बांधकामाची पार्श्‍वभूमी

येथील नाथ मंदिर परिसरात आरक्षण क्र.२९ यात्रा मैदान या जागेवर ४४ गाळे बांधले होते. गाळ्यांचे बांधकाम भूखंड क्रमांक.१०५१, १०५३, १०५४, १०५६ व १०५७ या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर केले. याबाबत नगर परिषदेने परवानगी व ठराव न घेता गाळे बांधले होते. हे बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ मधील तरतुदीनुसार अनधिकृत ठरत असल्याचे याचिकेवरील सुनावणीच्या निकालात न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे या नियमांच्या आधारे गाळे बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी हा आदेश दिला.

Comment here