Film & entertainment

शूटिंग करताना अमिताभ बच्चननी का फोडला कॅमेरा?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर अधिक सक्रिय पहायला मिळतात. ते नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातले, शुटिंगच्या सेटवरचे किंवा आपल्या नव्या प्रोजेक्ट संदर्भातल्या अपडेट्स देण्यासाठी फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून नवनवीन पोस्ट करताना दिसतात. त्यांच्या पोस्टवर देखील त्यांचे चाहते मोठ्या उत्साहानं आपल्या प्रतिक्रिया नोंदवतात. नुकताच अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शुटिंगच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आणि त्याची चर्चा सगळीकेड होऊ लागलीय.
अमिताभ यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शूटिंगच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. जो त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. आणि त्यांनी तो फोटो पोस्ट करून लिहिलंय,”मी वयाची ८० गाठायला आलोय पण काही गोष्टी कशा बदलल्या नाहीत हे आजही अनुभवतो”. तो फोटो सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स शूट करतानाचा आहे. अमिताभ त्या फोटोत एक भलीमोठी काच फोडताना दिसत आहेत. तो फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे,”वय वर्ष ८० आणि ५३ वर्षांनंतरही”…काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. …अॅक्शन”.
अमिताभ यांच्या या फोटोवर अभिनेत्री उषा जाधवनं पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. तिनं या फोटोवर हार्ट इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. अमिताभ यांच्या एका चाहत्यानं लिहिलंय की,”हिंदी सिनेमांचा हा इतिहास आहे की जेव्हा पण अमिताभ यांची एन्ट्री पडद्यावर झालीय तेव्हा शिट्टयांचा आवाज आणि तुमच्या नावाची घोषणा झाली नाही असं कधीच घडलं नाही. आणि हे ना कधी कुठे पाहिलंय ना कधी पहायला मिळेल. तुमच्या इतकं प्रेम कधी कुठल्या इतर स्टार्सला चाहत्यांनी दिलं असेल असं वाटत नाही. तुम्ही ईश्वराची एक अद्भुत निर्मिती आहात”. तर एकानं त्यांना ”लिजेंड” म्हणत प्रशंसा केलीय.
अमिताभ यांनी अॅक्शन सीक्वेन्स शूट करतानाचे काही जवळून क्लिक केलेले फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्या फोटोत ते बेसबॉलची बॅट कॅमेऱ्याच्या दिशेने फेकताना दिसत आहेत. जणू ते आता कॅमेरा फोडणारच आहेत असा भास तो फोटो पाहताना होईल. अमिताभ सध्या नागा अश्विन यांच्या ‘Project K’ सिनेमात काम करीत आहेत. तसंच,४ मार्चला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या सिनेमात ते एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Comment here