Business & Auctions

ओमिक्रॉनचा झटका! तेजीला ब्रेक; घसरणीसह उघडले सेन्सेक्‍स-निफ्टी

ओमिक्रॉनच्या चिंतेमध्ये बुधवारी अमेरिकन बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. त्याचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे. आज म्हणजेच गुरुवारी बाजार घसरणीसह उघडला. यासह गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली तेजी संपुष्टात आली. 30 शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्‍स गुरुवारी 491 अंकांनी घसरून 59,731.75 वर उघडला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 17768 च्या पातळीपासून दिवसाच्या व्यवहाराला सुरुवात केली.
बुधवारी डाऊजोन्स 392 अंकांनी घसरून 36407 वर तर 522 अंकांच्या घसरणीसह 15100 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, S & P 93 अंकांनी घसरला, 4700 वर बंद झाला. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ही घसरण कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्‍स (Sensex) 513.02 अंकांनी घसरून 59,710.13 वर, तर निफ्टी (Nifty) 182.55 अंकांनी घसरून 17,742.70 च्या पातळीवर होता.

बुधवारची परिस्थिती

सलग चौथ्या व्यापार सत्रात शेअर बाजारात (Stock Market) तेजी होती आणि बुधवारी बीएसई सेन्सेक्‍स 367 अंकांनी वाढून 60,000 च्या पातळीवर पोहोचला. बॅंक आणि वित्तीय शेअर्समुळे युरोपियन बाजारांमध्ये सकारात्मक कल वाढला. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्‍स 367.22 अंकांनी म्हणजेच 0.61 टक्‍क्‍यांनी वाढून 60,223.15 वर बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 120 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्‍क्‍यांनी वाढून 17,925.25 वर बंद झाला.

Comment here