City News

Nobel Prize in Literature 2021: कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना यंदाचं साहित्यातील नोबेल! जाणून घ्या का दिला सन्मान

2021 सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना प्रदान करण्यात आले आहे. गुर्ना यांनी आपल्या लेखनातून निर्वासितांसाठी लोकांच्या हृदयात प्रेम निर्माण केले आहे. स्टॉकहोम : 2021 सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना प्रदान करण्यात आले आहे. पुरस्काराची घोषणा करताना स्वीडिश अकॅडमीने म्हटले की, अब्दुलरझाक गुर्ना यांनी आपल्या लिखाणातून वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृतीबद्दल बरेच काही लिहिले आहे. निर्वासितांचे भवितव्य ठरवण्याच्या त्याच्या दृढ आणि करुणामय प्रवृत्तीने त्यांनी जगाच्या हृदयात प्रेम निर्माण केले आहे.

निर्वासित म्हणून आले होते इंग्लंडला
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते अब्दुलरझाक गुर्ना यांच्या दहा कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा प्रकाशित झाल्या आहेत. निर्वासितांच्या समस्या त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी इंग्रजीमध्ये लिहायला सुरुवात केली. वास्तवात त्यांची लेखनाची भाषा सुरुवातीला स्वाहिली होती. पुढे त्यांनी इंग्रजी हे आपले लेखनाचे माध्यम बनवले. अब्दुलरझाक गुर्ना यांचा जन्म 1948 मध्ये झाला. ते झांझीबार बेटावर मोठे झाले. पण, 1960 च्या उत्तरार्धात शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये आले. सेवानिवृत्तीपूर्वी, ते केंट विद्यापीठ, कॅटरबरीमध्ये इंग्रजी आणि उत्तर -औपनिवेशिक साहित्याचे प्राध्यापक होते.

Nobel Prize 2021 For Chemistry : बेंजमिन लिस्ट आणि डेविड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल

लुईस ग्लूक यांना 2020 मध्ये साहित्यासाठी नोबेल
वर्ष 2020 साठी साहित्यातील नोबेल पारितोषिक अमेरिकन कवी लुईस ग्लूक यांना प्रदान करण्यात आले होते. लुईस येल विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1943 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांच्या कवितांमध्ये अनेकदा बालपण, कौटुंबिक जीवन, पालक आणि भावंडांशी घनिष्ठ संबंध यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात असे म्हटले आहे की 2006 मध्ये आलेला त्याचा एव्हर्नो हा एक उत्तम संग्रह आहे.

Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

पुरस्काराचे स्वरुप काय आहे?
नोबेल पुरस्कारांतर्गत, एक सुवर्णपदक, एक कोटी स्वीडिश क्रोनर (सुमारे 8.20 कोटी रुपये) दिले जाते. स्वीडिश क्रोनर हे स्वीडनचे चलन आहे. हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर आहे.

नोबेल पुरस्कार काय आहे?
स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीपासून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. नोबेल यांनी स्फोटक डायनामाइटचा शोध लावला होता. त्यांचा आविष्कार युद्धात वापरला गेल्यामुळे ते खूप दुःखी झाले. याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी नोबेल पारितोषिकांची त्यांच्या मृत्यूपत्रात व्यवस्था केली होती. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिले आहे की त्याची बहुतांश संपत्ती एका फंडात ठेवली जाईल आणि त्याचे वार्षिक व्याज मानवजातीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना पुरस्कृत केले जावे.

Comment here