City News

वानखेडे चैत्यभूमीवर; नवाब मलिक म्हणाले, “जय भीम…”

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मागच्या महिनाभरापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. हा वाद अनेक दिवस राज्यात चर्चेचा विषय होता. त्यातच समीर वानखेडे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावर आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
चैत्यभूमीवर येण्याचा सर्वांना अधिकार आहे असं ते म्हणाले. समीर वानखेडे वानखेडे यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, जय भीम नावाचा सिनेमा आलेला आहे. यामध्ये एस.टी. वर्गातील लोकांवर कसा अन्याय होतो हे दाखवण्यात आलं. असाच संघर्ष मी निर्माण केला असून. या जयभीम इम्पॅक्टमूळेच ते आता अभिवादन करायला येत असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक एकत्र येत असतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माननाऱ्या राज्यासह देशभरातील लोकांचा समावेश असतो. यावेळी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर जास्त गर्दी न करण्याचं आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज चैत्यभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

Comment here