City News

नेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM

जेरुसलम- इस्त्रायलचे पंतप्रधान ( Israel prime minister) म्हणून 12 वर्षांची बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांची कारकीर्द रविवारी संपुष्टात आली आहे. संसदेने सरकारच्या बदलास परवानगी दिली असून नेफ्ताली बेन्नेट्ट (Naftali Bennett) नवे पंतप्रधान असतील. सर्वात शक्तीशाली राजकारणी म्हणून ओळखले जाणारे 71 वर्षीय बेंजामिन नेतान्याहू यांना अखेर पायऊतार व्हावं लागलं आहे. असं असले तरी त्यांनी लवकरच पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास व्यक्त केलाय. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Benjamin Netanyahu ousted as Israel prime minister Naftali Bennett to lead new government)

इस्त्रायलमध्ये अनेत दिवसांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. नेतन्याहू यांनी सत्ता स्तापन करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. पण, यावेळी त्याना यश आलं नाही. संसदेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात 60-59 अशा शुल्लक फरकाने बेन्नेट्ट यांचा विजय झाला. नेतन्याहू यांच्या उजव्या पक्षाने आणि त्यांच्या कट्टर रुढीवादी समर्थकांनी बेन्नेट्ट यांच्या विजयानंतर संसदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.माजी संरक्षणमंत्री आणि हाय-टेक मिलिनियर असलेले 49 वर्षीय बेन्नेट्ट यांनी विश्वासदर्शक ठरावात विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या आघाडीमध्ये अल्पसंख्याक अरबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात इस्त्रायलमध्ये चार वेळा निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येकवेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रत्येक वेळा पक्षांना एकमेकांची साथ घ्यावी लागली.
इस्त्रायलचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर असलेले नेतान्याहू 2009 पासून सत्तेत होते. नंतरच्या काळात त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी कायम हे आरोप फेटाळले आहेत. पण, सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळे त्यांची शक्ती नक्कीच कमी झाली किंवा त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. युती करारानुसार, यायीर लापिड (वय 57) 2023 मध्ये पंतप्रधान पदी विराजमान होतील, असं सांगितलं जातंय. दरम्यान, नफ्ताली बेन्नेट्ट नेतान्याहू यांची उजवी विचारसरणीच कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनबाबतच्या त्यांच्या भूमिकेत तीळमात्र बदल न होण्याची शक्यता आहे.

Comment here