City News

६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

Waluj, 2 June. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी तब्बल १ लाख ५० हजार रूपयांची मागणी करुन तडजोडी अंती ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.आहे गणेश अंतरप असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. जालन्याची घटना ताजी असतानाच आज वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने पोलिस प्रशासनात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.याविषयी अधिक माहिती अशी कि, तक्रारदाराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी पोलिस हवालदार गणेश अंतरप यांनी साक्षिदारासमक्ष तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तडजोडी अंती ६० हजार घेण्याचे मान्य करून ६० हजार रुपये साक्षीदारासमक्ष स्वीकारले. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर अधीक्षक मारुती पंडित, उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलिस नामदार गंगाधर भाताने, अशोक नागरगोजे, पोलिस शिपाई कपील गाडेकर, पोलिस अंमलदार चालक चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून पार पाडली.

Comment here