State News

मेहुल चोक्सीचं अपहरण करुन भारतात आणण्याचा डाव होता; वकिलाचा गंभीर आरोप

पोलीस असल्याचं सांगत आठ ते १० जणांनी मला मारहाण केली; मेहुल चोक्सीचा नवा आरोप. पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून पसार झालेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताला अद्याप प्रतिक्षा करावी लागणार आहे. मेहुल चोक्सीने डोमिनिकामधील कोर्टात याचिका दाखल केली असून याशिवाय अजून एका प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. यादरम्यान मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे अपहरण झाल्याचा दावा केला असून गंभीर आरोप केले आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे केलेल्या आरोपात म्हटलं आहे की, “८ ते १० जणांनी अँटिग्वा पोलीस असल्याचं सांगत मला अमानुषपणे मारहाण केली. मी अजिबात शुद्धीत नव्हतो. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकिट काढून घेतलं. मला लुटण्याचा हेतू नसल्याचं सांगत त्यांनी माझे पैसे परत केले”. अपहरणामागचा नेमका उद्देश काय?
मेहुल चोक्सीतर्फे कायदेशीर लढा लढणारे अॅटर्नी जनरल जस्टीन सिमन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे की, “मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये आणून कोणताही गाजावाजा करता भारतात नेण्याचा योजना असावी असं मला वाटतं. या योजनेत सहभागी काही अधिकाऱ्यांनाच याची माहिती असावी. सुदैवाने डोमिनिकात अटकेची कारवाई झाल्यानंतर मला माहिती मिळाली आणि मी चार वकिलांशी संपर्क साधला. त्यामधील एक जण पोलीस ठाण्यात दगेला. त्याला मी अँटिग्वामधील वकील म्हणून पाठवलं होतं. पण त्याला भेटीसाठी नकार देण्यात आला. यावेळी त्याने गोंधळ केला असताना तिथेच जेलमध्ये असणाऱ्या मेहुल चोक्सीनेही आवाज दिला. यानंतरच आम्ही कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली”.

Comment here