City News

12 तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस; मृग नक्षत्र सुरू;

Monsoon Update : 8, June. आतापर्यंत मॉन्सूनने (Monsoon) अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत मान्सून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोमवारी मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती दिसून आली आहे. मॉन्सूनची उत्तर सीमा रविवार प्रमाणेच अलिबाग, पुणे, करमाळा, सोलापूर जिल्ह्यात असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
उत्तर महाराष्ट्र ते केरळ किणारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाची पट्टा अजून कायम आहे. मात्र, कोकण गोव्यावर चक्रीय चक्रवात आता विरले असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. मॉन्सून जरी दाखल झाला, तरी पुढील तीन चार दिवस त्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारी (ता.११) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १२ ते १७ जून दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेष करून घाटमाथ्यावर जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मृग नक्षत्र सुरू झालं आहे. अर्धा महाराष्ट्रात पेरणी सुरु झाली आहेत. तर विदर्भातील बळीराजाही मॉन्सूनच्या प्रतिक्षेत आहे. मान्सून महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाल्याने विदर्भात नेमका केव्हा येईल, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मॉन्सूनच्या विदर्भातील संभाव्य आगमनाबद्दल हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असला तरी विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाला आणखी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.

Comment here