Birthday WishespoliticsState News

संरक्षण मंत्रालयासाठी लागणारी उत्पादने बनवण्याची संधी

औरंगाबाद : संरक्षण मंत्रालयाच्या इनोव्हशन फॉर डिफेन्स एक्सलन्स आणि पंतप्रधान मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना परिषद यांच्या विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या अ‍ॅक्सिलेटरिंग ग्रोथ ऑफ न्यू इंडिया इनोव्हेशन्स अग्नी उपक्रमामार्फत वर्ष २०२१-२२ साठी पाचव्या डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंजची घोषणा करण्यात आली. सीएमआयएच्या ‘मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल’ अर्थात मॅजिक या चॅलेंजअंतर्गत अग्नीचा आऊटरिच पार्टनर म्हणून काम करणार असून या माध्यमातून नवोद्योजकांना संरक्षण मंत्रालयासाठी उत्पादने बनवण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता.१६) खास वेबिनारचेही आयोजन करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्रालयाने इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्समध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आयडेक्स सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगामार्फत संरक्षण मंत्रालयाला लागणाऱ्या देशी उत्पादनांच्या खरेदी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी आयडेक्स सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग उद्योजकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज हाही याचाच एक भाग आहे.
डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंजमार्फत देशातील सर्वच स्तरातील नवोद्योजकांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी गुरुवार (ता.१६) सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://investindiavc.webex.com/investindiavc/onstage/g.php?MTID=e८००५२१०a९९ad६२०f२०b७२b५१२१४७१६०४ या लिंकवर रजिस्ट्रेशन करण्याचे आव्हान मॅजिकतर्फे करण्यात आले.

Comment here