भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना घाम फोडला आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी १८४ कोटी रुपयांचे बेनामी संशयास्पद व्यवहार झाल्याचं सांगताना यामध्ये महाराष्ट्रातील प्रभावशाली कुटुंबाचा सहभाग असल्याचं म्हटलं होतं. यावरून सोमय्या यांनी हा अजित पवार घोटाळा असल्याचं म्हटलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत थेट अजित पवार यांचे नाव घेतले आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर म्हटलं की, अजित पवार घोटाळा
9 दिवसांचे आयकर छापे
मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… 70 ठिकाणी छापे
१००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने….
कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी
184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहारप्राप्तिकर विभागाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान काही कागदपत्रे जप्त केली होती. तसंच, या समूहांशी संबंधित काही व्यक्तींचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती. यामध्ये १८४ कोटींची बेनामी संपत्ती समोर आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे सांगण्यात आलं. तसंच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे असंही सांगण्यात आलं की, यामध्ये महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाचाही सहभाग आहे.सीबीडीटीने शुक्रवारी दिली माहिती
एक आठवड्यापूर्वी प्राप्तिकर विभागाने मुंबईसह पुणे, बारामती, गोवा, जयपूर येथील ७० ठिकाणांवर छापा टाकला होता. यावेळी अनेक बेहिशेबी व्यवहार उघड झाल्याचे सीबीडीटीने शुक्रवारी सांगितलं. यात मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांच्या १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावेही मिळाले आहेत. बेहिशेबी व्यवहारांसाठी या समूहांनी काही बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते अशी माहितीसुद्धी सीबीडीटीने दिली होती.
Comment here