अकोला : नागपूर कराराप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश विदर्भात नागपूर येथे आयोजित केले जाणे आवश्यक आहे. मात्र, गेले दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाचे कारण दे नागपुरातील अधिवेशनाला खो दिला जात आहे. यावर्षीही हिवाळी अधिवेश मुंबईत होणार आहे. ते बघता विदर्भाच्या न्याय हक्कासाठी किमान आता उन्हाळी अधिवेश तरी नागूपर येथे आयोजित केले जावे, अशी अपेक्षा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. ता. २२ ते २९ डिसेंबर अधिवेशन आयोजित केले जाईल. हे अधिवेशन नागपूरमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्या ऐवजी मुंबईत अधिवेशन होणार असल्याने विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची आणखी एक संधी गेली आहे. हिवाळी अधिवेशनाची संधी गेली असली तरी विदर्भाच्या न्याय हक्कासाठी किमान उन्हाळी अधिवेशन तरी मुंबई ऐवजी नागपुरात घ्यावे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समन्यायी वाटपाचा मुद्दा मार्ग लागू शकेल.
वैधानिक मंडळही नाही!
वैधानिक मंडळाची स्थापना नसल्यामुळे माननीय राज्यपाल माननीय राज्यपालांद्वारे निधी वाटपाचे निर्देश पण शासनाला दिले जात नसल्याने विदर्भ मराठवाड्यातील विकासाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात झाल्यास महाराष्ट्रातील मागासलेले प्रदेश विदर्भ व मराठवाड्याला न्याय मिळू शकेल.
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अपेक्षेमुळे, दरवर्षी हिवाळ्यात होणारे अधिवेशन नागपूरला न होता परत मुंबईला डिसेंबर महिन्यात होत आहे. मागील वर्षी पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले नाही. विदर्भाच्या न्यायपूर्ण मागणीसाठी व महाराष्ट्रात समन्यायी वाटपासाठी, आता मार्चमध्ये होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरमध्ये व्हावे, जेणेकरून विदर्भातील समस्यांना न्याय मिळू शकेल.
– डॉ. संजय खडक्कार,
Comment here