Aurangabad, 24 June. लॉकडाऊनच्या काळात पालेभाज्यांचे दर नागरिकांच्या आवाक्यात राहिले. अनलॉकनंतर आता पालेभाज्यांचे दर दहा ते पाच रुपयांनी वाढलेले आहेत. केवळ बटाटा या पदार्थाचा दर कायम आहे. बटाटा १५ ते २० रुपये किलो दराने विकला जात आहे. मिरची ४० रुपये कांदा २५ रुपये किलो, टोमॅटो ४० रुपये किलोने विकला जातो. हाच भाव मोंढ्यात किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी स्वस्त आहे. भाजीमंडईत त्याचा भाव पाच ते दहा आणि वीस रुपयांपर्यंत जास्त घेतला जातो. पावसाचे आगमन लवकर झाले तर हे भाव पुन्हा कमी होऊ शकतात. हात गाडीवर गल्लोगल्ली भाजीपाला विकणाऱ्यांनी मागील काही दिवसांत दरवाढ बरीच झाल्याचे नमूद केले.
अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर चढ्याभावाने असून प्रत्येक फळ व पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसत आहे. अजून हे चित्र महिनाभर तरी राहण्याची चिन्हे आहेत.

Comment here