बिजिंग : जो बायडेन प्रशासनाने सोमावारी अमेरिकेचे सरकारी अधिकारी बिजिंग येथे होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करण्याची घोषणा केली. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला चीन प्रत्युत्तर देईल असे सांगितले.
जो बायडेन प्रशासनाने चीनमधील सुरु असलेला नरसंहार आणि मानतेविरुद्ध सुरु असलेली कारवाई याचा निषेध नोंदवण्यासाठी अमेरिकेचे अधिकृत शिष्टमंडळ बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार घालेल असे जाहीर केले. हा एक राजनैतिक बहिष्कार असेल. अशा प्रकाराचा बहिष्कार घालावा यासाठी गेल्या काही आठवड्यापासून अमेरिकेतील काँग्रेसचे काही सदस्य मागणी करत होते. पण, या बहिष्काराचा अमेरिकेच्या खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या महिन्यात अशा प्रकाराचा राजनैतिक बहिष्कार घालण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितले. हा बहिष्कार चीनमधील मानवाधिकार उल्लंघनाचे रेकॉर्ड पाहता आणि चीनमध्ये अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायविरुद्ध जो नरसंहर सुरु आहे त्याच्या विरोधात असणार आहे.
दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री लिजियान यांनी ‘जे कोण हा बहिष्काराची भाषा करत आहेत ते चीन आणि अमेरिकेमध्ये आयात सुरळीत व्हावा यासाठी सुरु असलेल्या चर्चांमध्ये अडथळा निर्माण करत आहेत.’ असे धमकीवजा वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना लिजियान पुढे म्हणाले की, ‘जर अमेरिकेने आपली बहिष्काराची भुमिका ठाम ठेवली तर चीन त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलेल.’
अमेरिकेचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीनची प्रत्युत्तराची धमकी

Comment here