श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार (kulgam terrorist attack) केला. या गोळीबारात एका रेल्वे पोलीस (railway police) कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले. पण त्याने प्राण सोडला. गोळीबार झालेल्या भागाला घेराव घातला असून तिथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगामच्या वनपोह भागामध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. बंटू शर्मा नावाच्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या बंटू यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे दहशतवादी कुठल्या संघटनेचे आहेत? किती दहशतवाद्यांनी हल्ला केला, ते अजून स्पष्ट झालेले नाही.या घटनेनंतर सुरक्षा पथकं अधिक सर्तक झाली आहेत. काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या अचानक हल्ल्याच्या घटना घडत असतात. कुलगाममध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एका नागरिकाला लक्ष्य करण्यात आले. त्याची सुद्धा हत्या करण्यात आली.
काश्मीर: दहशतवाद्यांनी रेल्वे पोलीस कर्मचारी आणि नागरिकाची केली हत्या

Comment here