Sports

टी-20 वर्ल्ड कप : अफगाणिस्तानच्या गोलंदाजाकडून टीम इंडियाला वॉर्निंग

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या टीम इंडियाला आता अफगाणिस्तानचा गोलंदाजानं पराभवाचा इशारा देणारं धाडस करुन दाखवलंय. अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज हामिद हसन याने सेमी फायनलपर्यंत धडक मारण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवण्यासाठी आम्ही टीम इंडियाला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदान उतरु असे त्याने म्हटले आहे. सुपर 12 मधील दुसऱ्या गटात अफगाणिस्तानच्या संघाने तीन सामन्यातील दोन विजयासह चार गुण कमावले आहेत. बुधवारी अबुधाबीच्या मैदानात अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतील चौथा सामना खेळणार आहे. याशिवाय न्यूझीलंड विरुद्धही त्यांची एक लढत बाकी आहे. भारतीय संघ जर-तरच्या समीकरणात असताना पुढील दोन सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानला थेट सेमी फायनल गाठणयाची संधी आहे.
सामन्यापूर्वी हामिद हसन म्हणाला की, आम्ही टीम इंडियासोबतच्या लढतीकडे एक संधी म्हणून पाहत आहोत. सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर आम्ही त्यांना पराभूत करु शकतो. 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या जलदगती गोलंदाजाला भारतीय संगाच्या फ्लॉप टॉप आर्डरवरुनही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, लवकरात लवकर विकेट मिळवण्यासाठी खेळपट्टी कशी खेळते हे पाहावे लागेल. सामन्याआधीच यावर भाष्य करणं कठीण आहे. आम्ही आमच्या रणनितीनुसार खेळू. फिरकीपटू असेल किंवा जलदगती गोलंदाज असेल संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न राहिल.
आम्ही स्पर्धेचा विचार न करता एका मॅचवर फोकस करत आहोत. सेमी फायनल हे आमचे लक्ष्य असले तरी यासाठी पुढील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानचा संघ मजबूत होत असून आम्ही कोणत्याही संघाला टक्कर देण्यास सक्षम असल्याचे त्याने बोलून दाखवले.

Comment here