२०० कोटी वसुलीच्या प्रकरणात ईडीनं समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात हजर झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जॅकलिनला मुंबई विमानतळावरुन परत पाठवण्यात आलं होतं. ती दुबईला निघाली होती. पण २०० कोटींच्या वसुली प्रकरणात तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आलं असल्यानं ती देश सोडून जाऊ शकत नाही असं सांगत ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला विमानतळावरुन परत पाठवलं होतं. त्यानंतर ईडीनं तिला चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं आहे .
सुकेश चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत मिळून जॅकलिनवर २०० कोटी रुपये वसूल करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याबातीत आरोपपत्रही दाखल करण्यात आलेलं आहे. सुकेश चंद्रशेखरनं दिल्लीत एका व्यवसायिकाच्या पत्नीकडून २०० कोटी रुपये वसूल केले होते. त्यानंतर हवालाच्या मार्फत या पैशांची फेरफार करण्यात आली आणि नंतर क्रीप्टो करन्सी खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरण्यात आल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकरणात सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिन फर्नांडीसला १० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे गिफ्ट्स दिले असल्याचं ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. तसंच सुकेश हा जेलमधून जॅकलिनच्या संपर्कात होता आणि तो जामिनीवर सुटला तेव्हा ते दोघं एकत्र हॉटेलमध्ये राहिले होते असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे..
२०० कोटी वसुली प्रकरण; जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर हजर

Comment here