अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना आजपासून (७ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. बॉलिवूडमधल्या या सर्वांत मोठ्या लग्नसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक बारिकसारिक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विकी-कतरिनाच्या लग्नाचा मेन्यू हा भारतीय आणि पाश्चिमात्य पदार्थांनी परिपूर्ण असेल. विकी आणि कतरिनाने पाहुण्यांची यादी आणि विशेषत: भारताबाहेरील कुटुंबातील सदस्यांना लक्षात घेऊन मेन्यूमधील पदार्थ निश्चित केले आहेत.
‘बिग फॅट वेडिंग’साठी विकी-कतरिनासह कुटुंबीय राजस्थानला पोहोचले आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर इथल्या हॉटेल सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार जेवणाच्या मेन्यूमध्ये कचोरी, चाट स्टॉल, कबाब आणि पारंपारिक राजस्थानी पदार्थांचा समावेश असेल.
विकी-कतरिनाच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू-
कचोरी, दही भल्ला आणि फ्युजन चाटचे स्टॉल्स
उत्तर भारतीय पदार्थ ज्यात कबाब आणि फिश प्लॅटरचा समावेश असेल
१५ विविध डाळींपासून बनवलेला दाल बाटी चुरमा
इटलीतील शेफने बनवलेला टिफनी वेडिंग केक
पान, पाणीपुरी आणि इतर भारतीय पदार्थांसाठी स्वतंत्र स्टॉल
Comment here