City News

आज पासून मनपाच्या 40 केंद्रावर लसीकरण सुरू

Aurangabad, 24 May. मनपाकडे सध्या 3 हजार 980 लसींचा साठा शिल्लक आहे. यात कोव्हॅक्सिन 300 तर कोवीशिल्डचे 3,680 डोस आहेत. आज 9 हजार लस प्राप्त होणार, त्यातुन 40 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. शनिवारी 66 केंद्रावर 2,126 नागरिकांना लस देण्यात आली रविवारी लसीकरण बंद होते. आज 40 पैकी 37 केंद्रावर फक्त 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला होता. तर तीन केंद्रावर कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस देण्यात आला. हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी दोन्ही केंद्रावर केवळ दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.
https://youtu.be/oS0fT1rxcdc

Comment here