आमगाव, गोंदिया, ( विशेष प्रतिनिधी ) दिनांक – २९ मे २०२१ – कायद्याचे रक्षण करणारे पोलिश जेव्हा अति करतात तेव्हा ते सुद्धा आरोपी होतात, सध्या आमगाव पोलिश स्थानकात ५ पोलिश एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या हत्या प्रकरणात सध्या गजा आड आहेत, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्या प्रकरणी, सी आय डी ने तपास केल्याचे सूत्र सांगतात त्या नुसार २७ मे रोजी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, या मुळे आमगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षकासह, सहायक पोलीस निरीक्षक तसेच तीन पोलीस शिपायांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून एक सहायक पोलीस निरीक्षक हा पसार झाला आहे. २० मे रोजी आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत 3 चोरटयांनी दरोडा घातला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपींना अटक करीत २१ मे रोजी आमगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. माझ्या भावाला बेदम मारहाण केली असून त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्च्या बहिणीने केला होता. दरम्यान, मृत राजकुमार याच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे उघडकीस आले असून, अमानुषपणे मारहाण केल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे.
पहिल्यांदाच एकाच वेळेला एकाच पोलीस ठाण्यात इतक्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे यांच्या विरोधात कलम ३०२, ३३०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हा पसार असून त्याचा शोध सुरु आहे.
Comment here