भाजपनेते आशिष शेलार यांनी काल मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून सांगितलं आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या तक्रारीनुसार दोन वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून त्यांना धमकीचे फोन आले आहेत. या संदर्भात तपास करण्याची विनंती त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
आमदार आशिष शेलार यांच्या कुटुंबियांना काही धमकीचे फोन आले. या फोनवर एका अज्ञान व्यक्तीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देत, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली. त्यामुळे शेलार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी त्यांनी आपल्याला आलेल्या दोन्ही क्रमांकांची माहिती देखील पोलिसांना दिली. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्याची विनंती पोलिसांना केली.
शेलार यांना यापूर्वीही अशी धमकी आली होती. २०२० मध्ये देखील शेलार यांना अशी धमकी आली होती. तेव्हा सुद्धा शेलारांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी एका आरोपीला मुंब्र्यातून अटक केली होती. तर अतिरेक्यांनीही त्यांच्या घराची रेकी केल्याचं एक प्रकरण समोर आलं होतं.
आशिष शेलारांना धमकी! यापुर्वी दहशतवाद्यांनीही केली होती रेकी

Comment here