पुणे : एसटीचा संपामुळे ग्रामीण भागात पीएमपीने वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसांत पीएमपीच्या तिजोरीत १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जमा झाले आहे. शहर, उपनगरांपेक्षा या मार्गांवर पीएमपीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.एसटीचा संप सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातही पीएमपीला वाहतूक सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शहराच्या चारही दिशांना एसटीच्या कार्यक्षेत्रात पीएमपीने वाहतूक सुरू केली आहे.
त्या गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहर आणि उपनगरांतील पीएमपीच्या प्रती बसला दिवसाला सुमारे ५ ते ६ हजार रुपये उत्पन्न मिळते. तर जिल्ह्यातील मार्गांवर सध्या १० ते १२ हजार प्रति बस उत्पन्न मिळत आहे. जिल्ह्यात १३ तालुके आहेत. त्यातील इंदापूर आणि जुन्नर वगळता आता उर्वरित ११ जिल्ह्यांत पीएमपीच्या बसची वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती माहिती पीएमपीचे वाहतूक अधिकारी दत्तात्रेय झेंडे यांनी दिली. वेल्हा, सासवड, विंझर आदी मार्गांवर यापूर्वीच वाहतूक सुरू झाली आहे.
टोलचा प्रश्न कायम
सातारा रस्त्यावर खेड शिवापूर तसेच मुंबई रस्त्यावर सोमाटणे फाटा, लोणावळा येथे पीएमपीला टोल द्यावा लागत आहे. खेड शिवापूरला दरमहा ७५ हजार रुपये तर मुंबई रस्त्यावर दोन्ही ठिकाणी दरमहा सुमारे एक लाख २५ हजार रुपये टोलपोटी पीएमपीला संबंधितांना द्यावे लागत आहेत.
या मार्गांवर सुरू झाली पीएमपीची वाहतूक
रांजणगाव, चाकण, तळेगाव, शिक्रापूर, लोणावळा, मंचर, सारोळा, वरवंड, राजगुरूनगर, जेजुरी, मोरगाव, राहु, पारगाव लव्हार्डेया मार्गांवर एकूण १३६ बस सोडण्यात येत आहेत. प्रत्येक बसच्या दिवसातून सुमारे ४ फेऱ्या होत आहेत.नव्या मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या बसमुळे पीएमपीच्या गेल्या २५ दिवसांत अतिरिक्त १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जमा झाले आहे.
पीएमपीने दोन्ही शहरांतील वाहतुकीला प्राधान्य द्यायला हवे. एसटीचा संप असल्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक सध्या सुरू आहे. परंतु, एसटीची सेवा पूर्ववत झाल्यावर पीएमपीने दोन्ही शहरांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. एसटीचे प्रवासी पळवून काय साध्य होणार? शहरातील बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. लांब पल्ल्याच्या बसच्या फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पीएमपीची सद्यःस्थिती (प्रतिदिन)
मार्गांवरील बस(सुमारे) – १५००
प्रवासी संख्या -७,१५,०००
सरासरी उत्पन्न – १.१०कोटी
सातारा रस्त्यावर खेड शिवापूर तसेच मुंबई रस्त्यावर सोमाटणे फाटा, लोणावळा येथे पीएमपीला टोल द्यावा लागत आहे. खेड शिवापूरला दरमहा ७५ हजार रुपये तर मुंबई रस्त्यावर दोन्ही ठिकाणी दरमहा सुमारे एक लाख २५ हजार रुपये टोलपोटी पीएमपीला संबंधितांना द्यावे लागत आहेत.
Comment here