मुंबई : आज एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या वेतनवाढीनुसार हा पगार जमा होणार आहे. ठरल्याप्रमाणे पगारवाढ आज खात्यात जमा केली जाईल अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान मेस्मा संदर्भात आज कुठलीही बैठक नाही, मेस्माबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीतच होणार असल्याची माहिती मिळत आहे, कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतर सरकार प्रत्यक्षात खात्यात किती रक्कम जमा करणार याकडे आंदोलनातील इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार |

Comment here