कोरोनाच्या (corona) ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (omicron variant) धोका पुन्हा बळावू लागला आहे, अशा परिस्थितीत अनेक देश आपल्या नागरिकांना बूस्टर डोस (booster dose) देत आहेत. दरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतातील (indian citizen) अनेक लोक इतर देशांमध्ये जाऊन बूस्टर डोस घेत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. यामागील नेमके कारण काय?
भारतीय परदेशात जाऊन घेताएत बूस्टर डोस
भारतात बूस्टर डोस देण्यावर यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान भारतातील अनेक लोक इतर देशांमध्ये जाऊन बूस्टर डोस घेत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या लोकांमध्ये मोठ्या औद्योगिक घराणे किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. उद्योजकांचे म्हणणे आहे, की त्यांच्या कंपनीचे बरेच कर्मचारी बूस्टर डोस घेण्यासाठी भारताबाहेर प्रवास करत आहेत. ते म्हणाले की लोकांना त्यांच्या प्रतिकारशक्तीबद्दल काळजी वाटते, म्हणून ते वैद्यकीय सल्लामसलत केल्यानंतर परदेशात जात आहेत. एका मोठ्या कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचे अनेक कर्मचारी बूस्टर डोससाठी यूएसला गेले आहेत.
UK-USA व्यतिरिक्त दुबई देखील हॉटस्पॉट
भारतातील लोक जे बूस्टर डोससाठी परदेशात जात आहेत. ब्रिटन आणि अमेरिका या देशांना अधिक पसंती दिली जात आहे. त्याच वेळी, फायझरचा अतिरिक्त डोस घेणारे देखील दुबईला जात आहेत. एका कंपनीच्या सीईओने सांगितले की भारतात बूस्टर डोसवर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, मला माहित नाही की ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. परंतु लोकांना आरोग्याची काळजी आहे आणि त्यांना स्वतःचे संरक्षण करायचे आहे, त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही.
1.5 कोटी पेक्षा जास्त कोविडशील्ड डोस आरक्षित
त्याचवेळी सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी देखील सांगितले आहे की त्यांच्याकडे आधीच बूस्टर डोससाठी 1.5 कोटी पेक्षा जास्त कोविडशील्ड डोस आरक्षित आहेत.
Comment here