Aurangabad, 22 May. वर्तमान पत्र वितरणाचे काम करणाऱ्या एका युवकाला रस्त्यात अडवून, त्याच्यावर चुकीचे आरोप करून तिघांनी आकाशवाणी येथे मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अक्षय किसन वैद्य (२२, रा. संजयनगर, बायजीपूरा) हा एम. कॉम.मध्ये आहे. तसेच वर्तमानपत्र वाटण्याचेही काम करतो. तो २० मे रोजी पहाटे साडेपाचला त्याचा मित्र अनिल देशमुख याच्यासोबत आकाशवाणी येथील सोनपरी गोल्ड दुकानासमोर पेपर वाटत होता. या ठिकाणी तीन अनोळखी युवक आले. एकाने, तू पत्नीला मेसेज का करतो, अशी विचारणा केली. अक्षयने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मारहाण केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. रविराज अशोक महानीर (२२, रा. बायजीपुरा), आकाश गात (२१,रा. बायजीपुरा), ऋषीकेश वेताळ (२१, रा.कैलासनगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार सिद्दीकी तपास करीत आहेत.
औरंगाबादेत वर्तमानपत्र विक्रेत्यास तिघांकडून मारहाण

Comment here