औरंगाबाद : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच सोबत ओमिक्रॉनचा धोकाही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यापाठोपाठ औरंगाबादमधील शाळा बंद करण्याचा निर्णय बुधवारी (ता.पाच) घेण्यात आला आहे. त्यातच आता शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी प्रसिद्धपत्रक काढून हा आदेश काढला आहे.
शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण भागातील शाळांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शाळा बंदच्या कालावधीत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहे. नववी, दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादेतील पहिली ते आठवीच्या शाळा उद्यापासून होणार बंद

Comment here