औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीची रविवारी (ता.२१) निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी विजय जैस्वाल तर महासचिवपदी शिवशंकर स्वामी तसेच कोषाध्यक्षपदी जयंत देवळाणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. २०२४ पर्यंत ही कार्यकारिणी कार्यरत राहील.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेत ७२ विविध संघटनांनी व संस्थांनी यात सहभाग घेतला. या निवडणुकीसाठी यंदा चांगलीच चुरस दिसून आली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महासंघाच्या निवडणुकीचे तयारी सुरू होती.
उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-लक्ष्मीनारायण राठी, संजय कांकरीया, अजय मंत्री, ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, सहसचिव-गुलाम हक्कांनी, सुनील अजमेरा, जिल्हा संघटक-हरिश पवार, कचरू वेळंजकर, नीरज पाटणी यांचा समावेश आहेत. येथील ३१ पदांसाठी एकूण ३६ कार्यकारिणी सदस्यांची निवेदने आली होती. त्यात एकूण ३१ कार्यकारिणी सदस्य निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांसाठी १२ अर्ज आले होते.
औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्षपदी जैस्वाल

Comment here