Aurangabad, 17 June. स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत औरंगाबाद शहरातील सुमारे पंचवीस हजार व्यवसायिक मालमत्ता त्याच्या नळांना मीटर बसविण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासन तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सीईओ अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यासाठी राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले सध्या शहरात दररोज 125 एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे 5 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी पुरवठा मध्ये सुधारणा केली जाईल.
महापालिकेकडे 25 हजार व्यवसायिक नळ असल्याची नोंद केली आहे. या नळांना मीटर बसविण्याची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात राबविण्यात येईल, असे पांडेय यांनी सांगितले. तसेच स्मार्ट सिटी योजनेतून वॉटर मीटरची खरेदी करण्यात येणार आहे असे श्री पांडेय यांनी नमूद केले. हि योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील निवासी नळांना मीटर लावण्याची शक्यता आहे.
Comment here