देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरिही मृत्यूच्या आकडेवारीनं मात्र चिंता वाढवली आहे. मागील काही दिवासांत मृताची संख्याही कमी झाली होती. मात्र, गरुवारी कोरोनामुळे मृत्यूनं सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गुरुवारी आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंज झाली आहे. आरोग्य मंत्रालायनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशात सहा हजार 148 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.देशात आतापर्यंत 4 हजार 500 पर्यंत कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. मात्र गुरुवारी हा विक्रम मोडीत निघाला आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसातील आकडेवारी नोंदवली नव्हती. ती आकडेवारी बुधवारी अपडेट करण्यात आली.बुधवारी एकट्या बिहार राज्यात जवळपास 3 हजार 951 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. बिहारमध्ये अचानक वाढलेल्या मृताच्या संख्येमुळे देशातील कोरोना मृताचा विक्रम मोडीत निघाला आहे.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात 94 हजार 52 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. लागोपाठ तिसऱ्या दिवशी एक लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत एक लाख 51 हजार 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशातील सध्याची कोरोना स्थिती –
एकूण कोरोना रुग्ण (Total cases ) : 2,91,83,121
एकूण कोरोनामुक्त (Total discharges) : 2,76,55,493
एकूण मृत्यू (Death toll ) : 3,59,676
उपचाराधीन रुग्ण (Active cases ) : 11,67,952
एकूण लसीकरण (Total vaccination) : 23,90,58,360
Comment here