औरंगाबाद : खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील कोरोनाचा पाश्र्वभुमीवर मजलिस चॅरिटी एज्युकेशनल अॅण्ड रिलिफ ट्रस्ट अॅण्ड अॅक्सेस फाउंडेशन अंतर्गत अद्यावत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, थर्माेमिटर, ऑक्सिमिटर सह अत्यावश्यक औषधांची पहिली खेप आज सकाळी औरंगाबाद येथे दाखल झाली असुन आज दुपारी खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील सर्व वैद्यकीय साधन सामुग्रीचे लोकार्पण खासदार कार्यालय येथे केले.
एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे गोरगरीब जनतेला या संकटकाळी वेळेवर वैद्यकिय मदत मिळावी या उद्देशाने हैदराबाद येथून कोविड हेल्पलाईन अॅण्ड ऑक्सिजन बँक चालवत आहे. सदरील हेल्पलाईन अंतर्गत भारतात विविध ठिकाणी गोरगरीबांना मदत व्हावी त्यासाठी अत्यावश्यक असे वैद्यकीय उपकरणे व इतर साधन सामुग्री व औषधांची मदत पाठवत आहे. आतापर्यंत बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह व इतर राज्यात वैद्यकीय मदत पाठविण्यात आलेली.
औरंगाबादेत आज पोहचलेल्या पहिल्या वैद्यकीय मदतीत अद्यावत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, थर्माेमिटर, ऑक्सिमिटर आणि औषधांची किटचा समावेश असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी लोकार्पण करतेवेळी दिली.
सदरील मिळालेल्या वैद्यकीय उपकरणे व इतर वैद्यकीय साधनसामुग्री व औषधी किट यातून मालेगाव व धुलिया येथील गोरगरीब जनतेला हि मदत व्हावी साठी तेथे पाठविण्यात येणार आहे. सदरील सर्व व्हेंटिलेटर्स व इतर साहित्य खाजगी रुग्णालयासोबत करार करुन त्यांच्यामार्फत गोरगरीब रुग्णांना मोफत सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची वैद्यकिय उपकरणे व औषधांची पहिली खेप औरंगाबादेत दाखल
Related tags :
Comment here