बीजिंग : चीनमधील झेजीयांग या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रांतामध्ये कोरोना संसर्ग पसरला आहे. त्यामुळे मंगळवारी सुमारे पाच लाख लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. काही जिल्ह्यांतील कार्यालये बंद करण्यात आली आहेत.
देशाच्या पूर्वेकडील हा प्रांत औद्योगिक आणि निर्यातीचे केंद्र आहे. चीनमध्ये आज सापडलेले ५१ पैकी ४४ रुग्ण तेथील आहेत. गेल्या आठवड्याच्या सुरवातीपासूनच रुग्णांचा आकडा आता दोनशे झाला आहे. क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या चार लाख ४० हजार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतर काही देशांच्या तुलनेत चीनमधील रुग्णांचा आकडा कमी असला तरी बीजिंगमध्येही संसर्ग पसरला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सामुहिक चाचण्या तसेच लॉकडाउन या उपायांचा अवलंब केला आहे. हिवाळी ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.
पहिल्या रुग्णानंतर दक्षता
तियानजीतमध्ये ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण सोमवारी आढळला. त्यानंतर अधिकारी दक्ष झाले आहेत. गेल्या काही दिवसांत निंगबो या बंदरासह शाओशींग शहरात काही व्यापारी कार्यालये बंद करण्यात आली.
Comment here