Aurangabad, Chelipura, 29 May. शहरातील चेलीपुरा कॉर्नर वर पोलीस नाकाबंदी दरम्यान तपासणी करीत होते. या वेळी काही मुले रस्त्यावर फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. त्याच वेळी काही नागरिकांनी नाकाबंदी स्थळी येऊन पोलिसांना मुलांना का अडवले तसेच तुमाला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला पोलीस रक्षणासाठी आहे की मारहाण करण्यासाठी असे आरोप केला. पोलीस जमावाची समजूत घालत असताना या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती म्हणून या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात जमावामधील चार ते पाच अज्ञात नागरिकाविरोधात सरकारी कामात अडथळा घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरक्षक संभाजी पवार यांनी दिली असून या गोंधळानंतर परिसरात पोलिसांनी मुलांना बेदम मारले असे अफवांचे पेव फुटले होते. या गोंधळाच्या घटनेनंतर आज सकाळी चेलीपुरा भागात दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
चेलीपुरा भागात दंगाकाबू पथक तैनात | Anti Riot Squad deployed in Chelipura, Aurangabad

Comment here