Travel

जंजिरा पर्यटक संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

मुरूड : कोरोना (Corona) संसर्गामुळे मुरूड (Murud) येथील ऐतिहासिक जंजिरा (Janjira) किल्ल्यात (fort) प्रवेश बंद आहे. तो खुला करून किल्ल्यापर्यंतची नौका सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी राजपुरी (Rajapuri) येथील जंजिरा पर्यटक (Janjira Tourist) संस्थेने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भात निवेदन दिले आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक नाझमुद्दीन (Nazmuddin Qadri) कादरी यांनी दिली.
जंजिरा पर्यटक संस्था ४० वर्षांपासून राजपुरी-जंजिरा किल्ल्यादरम्यान प्रवासी नौका देत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. संस्थेचे सभासद व शिडांच्या नौकांवर काम करणारे खलाशी हा पर्यटकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. या सेवेमुळे सुमारे १०० कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. रायगड जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळावी, अशी विनंतीही निवेदनात केली आहे.

Comment here