WomenWorld

जगात भारी कोल्हापुरी! लीना नायर बनल्या फ्रान्सच्या Chanel कंपनीच्या CEO

भारतीय वंशाच्या लीना नायर यांच्या फ्रान्समधील लग्झरी ग्रुप Chanel च्या CEO पदी नियुक्ती झाली आहे. Chanel ही प्रसिद्ध अशी फॅशन कंपनी आहे. याआधी लीना नायर या युनिलवरसोबत काम करत होत्या. विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या असलेल्या लीना नायर यांचे महाराष्ट्रातील कोल्हापूरशी कनेक्शन आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील होलिक्रॉस स्कूलमध्ये झाले आहे.

लीना नायर फ्रान्सच्या दिग्गज कंपनीच्या CEO झाल्यानंतर पुन्हा एकदा जगात भारतीयांचा डंका वाजला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विवटरच्या सीईओपदाची धुरा भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्याकडे आली होती. याशिवाय मायक्रोसॉफ्ट, गुगल, अडोब, आयबीएम यांसारख्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. आता लीना यांचाही समावेश या दिग्गजांच्या यादीत झाला आहे.

Comment here