National

“जप्त केलेले पैसे परत करा…”; अत्तर व्यापाऱ्याची कोर्टात धाव

कर बुडवत शेकडो कोटी रुपयांचं घबाड जमा करणारा कानपुरमधील अत्तर व्यापारी पियुष जैन सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यातच आता अटकेत असलेल्या पियुष जैनने जप्त केलेली माझी संपत्ती मला परत करा अशी मागणी केली आहे. या संदर्भात पियुष जैन यांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. सध्या पियुष जैन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत कानपूर तुरुंगात आहे.
जप्त केलेल्या माझ्या संपत्तीमधून 52 कोटी रुपयांचा कर वसूल करावा आणि उर्वरीत सर्व रक्कम परत करावी अशी मागणी पियुष जैनने न्यायालयाकडे केली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स (DGGI) ने 52 कोटी रुपयांचा कर कापून उर्वरित रक्कम मला परत करावी अशी मागणी केली आहे.
डीजीजीआयचे वकील अंबरीश टंडन यांनी बुधवारी सांगितले की त्यांच्या घरातून जप्त केलेली रक्कम ही करचोरीची रक्कम आहे. वसूल केलेली रक्कम 42 बॉक्समध्ये ठेवून बँकेत जमा करण्यात आली आहे. टंडन यांनी सांगितले की, कानपूरमध्ये 177 कोटी 45 ​​लाख रुपये वसूल केले गेले आहेत जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दोनदा जमा करण्यात आले आहेत. पहिल्यांदा 25 पेट्यांमध्ये 109 कोटी 34 लाख 74 हजार 240 रुपये, तर दुसऱ्यांदा 17 पेट्यांमध्ये 68 कोटी 10 लाख 27 हजार रुपयांची रक्कम बँकेत पाठवण्यात आली आहे

Comment here