Sports

तुर्की विरुद्ध इटली मॅचने युरो कपची सुरुवात.

युरोपियन फुटबॉलची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा युरो चषकाला (UEFA 2020) आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. (UEFA Euro 2020 google Doodle italy vs turkey) मुंबई : युरोपियन फुटबॉलची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा युरो चषकाला (UEFA 2020) आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. कोरोना विषाणूमुळे युरो कप एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला होता. मात्र कोरोनाचं संकट जरासं आटोक्यात आल्यानंतर आजपासून या स्पर्धेतील युरो 2020 चा पहिला सामना तुर्की आणि इटली (turkey vs italy) यांच्यादरम्यान रोममधील ऑलिम्पिक स्टेडियमवर रात्री उशिरा खेळला जाईल. ही स्पर्धा संस्मरणीय करण्यासाठी गुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवलं आहे. गुगल नेहमीच विविध स्पर्धांवेळी खास डूडल बनवतं. आजही युरो कपच्या सुरुवातीप्रसंगी गुगलने खास डूडल बनविले आहे. फिफा विश्वचषकानंतरची (Fifa) युरो कप ही सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ पाहून गुगलने हे डूडल तयार केले. (UEFA Euro 2020 google Doodle italy vs turkey)

प्रथमच 11 देशांमधील 11 शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन
युरो चषकाला (UEFA 2020) आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 11 देशांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे यजमानपद अधिकाधिक 2 देशांकडे असायचं. या वेळी लंडन, ग्लासगो, कोपेनहेगन, सेव्हिल, बुडापेस्ट, एम्सर्टडम, रोम, म्युनिक, बाकू, बुखारेस्ट आणि सेंट पीटर्सबर्ग येथे स्पर्धेतील सामने खेळवले जातील. तुर्की-इटली आमनेसामने
युरो चषकातील पहिलाच सामना तुर्की आणि इटली दरम्यान होणार आहे. हा सामना रोममधील ऐतिहासिक ऑलिम्पिक स्टेडियमवर मध्य रात्री 12.30 वाजता सुरु होईल. सध्या इटलीमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, संख्या मर्यादित असेल, हे नक्की. अधिक माहितीनुसार, या सामन्यासाठी 20 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली जाऊ शकते.

कोरोनामुळे नियमांत बदल
मागील वर्षी, यूईएफए कार्यकारी समितीने कोरोनामुळे 5 सबस्टिट्यूट वापरण्यास परवानगी दिली होती. यापूर्वी केवळ 3 सबस्टिट्यूटलाच मान्यता होती. यासह, अतिरिक्त वेळ, पूर्ण वेळ (90 मिनिट) नंतर सहावा सबस्टिट्यूट देखील संघ वापरु शकतो तथापि, संघांना फुल टाईमपर्यंत केवळ तीन बदलाच्या संधी मिळतील. अतिरिक्त वेळेत चौथी बदलाची संधी मिळेल.

(UEFA Euro 2020 google Doodle italy vs turkey)

Comment here