National

नवज्योत सिंग सिद्धूंनी मागे घेतला राजीनामा; पंजाबमध्ये नवा ट्विस्ट

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी दिसून आल्या. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी देखील राजीनामा दिला होता. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या मोठ्या वादानंतर अमरिंदर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्दू यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. आपण राजीनामा मागे घेतला असून, लवकरच आपला पदभार स्विकारणार असल्याची माहिती नवज्योत सिंह सिद्धू यांनी दिली आहे.

Comment here