शैक्षणिक संस्थाचालकांकडून ८ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्री महिलेस अटक करता येत नाही यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झनकर यांच्या नातलगांचे हमीपत्र घेत डॉ. झनकर यांना घरी सोडले होते.
मात्र त्या हजर न झाल्याने त्या पसार झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ. वैशाली झनकर यांनी विभागास गुंगारा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर – झनकर यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्विकारल्याची कबुली विभागाकडे दिली.
तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात झनकर यांनी प्राथमिक शिक्षक पंकज आर. दशपूते यांच्या मार्फत तक्रारदारांकडे ९ लाख रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे तक्रारदारांनी याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी सुरुवातीस चालकास पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
Comment here