नवी दिल्ली: खासगी कंपनीत (Private firm) अधिकारी पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने गळफास (hang) घेतला. विनोद असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो राथीवास येथे रहायला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये (suicide note) त्याने पत्नी (wife) आणि सासू-सासऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या चिठ्ठीच्या आधारावर पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२०१९ मध्ये विनोदचे रितीका बरोबर लग्न झाले होते. मागच्यावर्षी या जोडप्याला एक मुलगी झाली. तीन महिन्यांपूर्वी रितीका तिच्या माहेरी आई-वडिलांकडे निघून गेली. विनोदने अनेकदा विनंत्या करुनही ती सासरी परतली नाही, असे चिठ्ठीत लिहिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.विनोद तिला परत आणण्यासाठी अनेक वेळा रितीकाच्या आई-वडिलांच्या घरी गेला. पण तो तिची समजूत घालू शकला नाही, असे विनोदचा मोठा भाऊ विजय कुमारने सांगितले. विनोद ११ सप्टेंबरला पुन्हा रितीकाच्या घरी गेला होता. त्यावेळी सासू-सासऱ्यांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केले, त्याला अपमानित केले.”१२ सप्टेंबरला माझ्या भावाने त्याच्यासोबत तिथे काय घडले ते सांगितले. त्याने पत्नीला आणि मुलीला घरी सोबत घेऊन जायची परवानगी मागितली. त्यावेळी त्याला मारहाण करण्यात आली” असे विजयने सांगितले. विनोदने रविवारी गळफास घेतला. असे टोकाचे पाऊल उचलण्याआधी विनोदने त्याच्या सासऱ्यांना फोन केला व यासाठी तुम्हाला जबाबदार धरणार असे सांगितले. विजय कुमारने हा दावा केला आहे.
Comment here