औरंगाबाद : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Babasaheb Ambedkar Marathwada University) विविध विभागांत राबविण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान नोंदणी करण्यात (Online Admission) येणार आहे. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक घेऊन (Aurangabad) आढावा घेण्यात आला. त्यानूसार २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. बारावीचे निकाल (Bamu) नुकतेच जाहीर झाले असून विद्यापीठात सुरु असलेल्या ९ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये बी.व्होक ऑटोमोबाईल, इंडस्ट्रीयल अॅटोमेशन (पदवी), अॅडव्हान्स डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड ग्राफीक्स आटर्स अॅडव्हान्स (डिप्लोमा), सर्टिफिकेट ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन फ्रेंच (डिप्लोमा), अॅडव्हान्स डिप्लोमा ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन, फ्रेंच (अॅडव्हान्स डिप्लोमा), बी.ए.जनसंवाद व वृत्तपत्रविद्या (पदवी), बॅचलर ऑफ परफॉमिंग आर्टस् बी.पी.ए, (पदवी), बी.एफ.ए ब्रीज कोर्स (पदवी एक वर्ष), सर्टिफिकेट इन मोडी स्क्रिप्ट (पदविका) या विषयांचा समावेश आहे.
प्रवेशासाठी ‘सीईटी‘ असणार नाही तर गुणवत्तेच्या आधारावर ४ ते १४ सप्टेंबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊन लगेच तासिकांना सुरुवात होईल, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णु क-हाळे यांनी कळविले आहे.
Comment here