मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्यांच्या गैरवर्तवणूक आणि इतर अनियमिततेबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या निलंबनाची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली.
वळसे पाटील म्हणाले की, परमबीर सिंह परतल्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी वाहनांचा वापर करू नये. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यात आणि सचिन वाझे यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या भेटीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.
वाझे-परमबीर सिंह यांच्या भेटीवर चौकशीचे आदेश
खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असलेले परमबीर सिंह अनेक महिन्यांपासून गायब होते. त्यांना कोर्टाने फरार घोषित केलं. यानंतर परमबीर सिंह मुंबईत चंदीवाल आयोगासमोर चौकशीला उपस्थित राहिले. यावेळी वाझेची सुनावणीही पार पडली.
सचिन वाझे मनसुख हिरेन हत्येशी संबंधित असल्याने त्याचीही चंदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. सुरुवातील दोघांमध्ये काही सेकंद बोलणं झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती समोर आली. यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणावर नाराजीव्यक्त केली. वाझे-सिंह भेटीबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.
परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरू : गृहमंत्री

Comment here