पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर फसवणूक तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि मारहाण केल्याप्रकरणी पाषणकर यांच्यासह दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर शिवाजीनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजीनगर पोलिस स्थानकात 43 वर्षीय व्यवसायिकाने यांच्याबद्दल तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम पाषाणकर यांनी फिर्यादीची 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिसात बोलवून बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.कोरोना महामारीच्या काळात बांधकाम व्यवसायात तोटा झाल्याने देणेकर्यांच्या तगद्याला वैतागून निराशेतून गौतम पाषाणकर हे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. तब्बल एक महिन्यानंतर त्यांना जयपूर येथील हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
Comment here