पुणे, 31 मे : पुणे-नाशिक रेल्वेसाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहे. मात्र कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देणार नाही. पोलीस बळाचा वापर करू नका, शेतकऱ्यांचा नाद करु नका. आमच्या मागण्या मान्य करा, तरच मोजणी करा असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आज दिला. खेड तालुक्यातील होलेवाडी मांजरेवाडी या परिसरातून देशातील पहिली पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी भुसंपादनाचे काम सुरू झाले आहे.
रेल्वे अधिकारी व खेड महसूल विभाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया समाजावून सांगत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी घेणार आहे. मात्र जमिनीला काय भाव देणार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुला रेड झोन असल्यामुळे शेतकरी भूमीहिन होणार आहे. त्यांचा योग्य तो मोबदला काय देणार, असे प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान विचारीत आहे. शेतकऱ्यांना या बाबत योग्य उत्तर रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळत नाही, अशी बाब समोर आली आहे.
Comment here