नेट-सेट पीएचडी संघर्ष समितीतर्फे गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या शंभर टक्के प्राध्यापक भरतीसाठी पुण्यात आठवडाभर सुरु असलेलं आंदोलन काल स्थगित करण्यात आले.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात आंदोलनकर्त्या प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर चाळीस टक्के जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले आणि आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
शंभर टक्के प्राध्यापक भरती, प्रचलित तासिका धोरण बंद करून समान काम-समान वेतन देण्यात यावे तसेच प्राध्यापक भरतीत संवर्गनिहाय आरक्षण लागू करावे या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. याला राज्यभरातून मोठा पाठींबा मिळाला होता.
Comment here