पाचोड (जि.औरंगाबाद) : शेतात फवारणी करण्यासाठी औषध घेण्याच्या बहाण्याने कृषी सेवा आलेल्या एका चोरट्याने भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालकाचे दोन लाख रुपये चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता.२०) सांयकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. अधिक माहीती अशी की, पाचोड (ता.पैठण) येथील सुनील चिंतामण मेहत्रे यांची औरंगाबाद-बीड महामार्गावर किसान कृषी सेवा केंद्र (Aurangabad) व भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र एकत्र असल्याने एक अज्ञात व्यक्ती बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास या कृषी केंद्रात आला. त्याने दुकानदार मेहत्रे यास दुकानात औषध मागितले. दरम्यान दुकानदार औषध देण्यासाठी औषधाकडे गेला (Crime In Aurangabad) असता त्या अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत ग्राहक सेवा केद्रांच्या गल्ल्यामध्ये ठेवलेले दोन लाख रोख रक्कम काढून पोबारा केला. थोड्या वेळाने दुकानमालकाचे ग्राहक सेवा केंद्राच्या काउंटरवर लक्ष गेले असता त्यास काउंटर उघडलेले दिसल्याने (Paithan) त्यांनी तात्काळ काउंटरची तपासणी केली.त्यांना काउंटरमधील दोन लाख रुपये रोख रक्कम गायब असल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूला त्या रकमेचा शोध घेतला, मात्र रक्कम सापडून आली नाही. त्यानंतरत्या औषध घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने ती रक्कम चोरल्याचे समजले. त्यानंतर दुकानदार राहूल मेहत्रे यांनी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पाचोड पोलिसांसह औरंगाबाद गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करीत आहेत. एकंदर पाचोड पोलिसांनी अनधिकृत उत्पन्नावर भर दिल्याने व अवैध धंद्यास खतपाणी घालण्यास सुरुवात केल्यावर अवैध धंद्याने नव्या जोमाने डोकेवर काढले आहे.
पैठणमध्ये औषध खरेदीचे निमित्त करुन दुकानातून दोन लाख चोरले

Comment here