Aurangabad, 2 June. पोलीस आयुक्तालय औरंगाबाद कार्यक्षेत्रामध्ये दिनांक ०१/०६/२०२१ ते दिनांक ३०/०६/२०२१ या कालावधीत “ऑपरेशन मुस्कान १०” ही विशेष शोध मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये हरवलेले अपरहित केलेले महिला व ० ते १८ वर्षे वयोगटातील हरवलेल्या पळविलेल्या मुलांसंदर्भात मुलांचे आश्रय गृह, अशासकिय संस्था, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुले बस्तु विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने, इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरवलेली मुले असे समजुन त्यांचे पालकांचा शोध घेण्यात येणार आहे. अशा शोध लागलेल्या बालकांना ताब्यात घेण्यात येवून त्यांना त्यांचे कायदेशीर पालकांचे ताब्यात देण्यात येणार आहे. ज्या बालकांचे पालकांचा शोध घेवूनही ते मिळाले नाहीत अशा बालकांना बाल सुधारगृह यांचेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जापु पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक निर्माण करून क १९ संसर्गिक रोगाचे नियम, अटी व इतर मामी विचारात घेवून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिनांक ०१/०६/२०२१ ते ३०/०६/२०२१ पावेतो १८टील हरवलेल्या त्या जास्तीत जास्त बालकांचा शोध घेथुन सदर विशेष मोतिम यशस्वीरित्या राबविण्याचे आदेश मा. पोलोस आयुक्त औरंगाबाद शहर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्गमीत केले आहेत. “ऑपरेशन मुस्कान १०” या विशेष मोहिमेस प्रसार माध्यमांनी व सर्व औरंगाबाद शहरवासियांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त निखिल औरंगाबाद शहर यांनी केले आहे.
पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर मार्फत “ऑपरेशन मुस्कान १०” या विशेष शोध मोहीमेचे आयोजन.

Comment here